Pune Crime : भयंकर! पतीच उठला जीवावर, पत्नीला पाण्यातून उंदीर मारण्याचे औषध देऊन खुनाचा प्रयत्न, लोणीकंद पोलिसांनी पतीला केली अटक


Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात प्यायला देऊन महिलेचा खूनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी पती, सासू, सासऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.तर पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.

हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, साक्षीचा पाच वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. Pune Crime

साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. हनुमंतने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!