Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?, लाईट कट केली म्हणून वीज कर्मचाऱ्याला मारहाण…

Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढेच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण मधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime
याप्रकणी वकार अहमद मोहम्मद मुख्तार शेख (वय ३६, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अफजल बागवान (रा. गॅलेक्सी प्रीमियम सोसायटीसमोर, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बागवान याने वीजदेयक न भरल्याने शेख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. वीज मीटरवर कारवाईसाठी शेख गॅलेक्सी सोसायटीच्या आवारात पाेहोचले, शेख यांना बागवानने कानाखाली मारली.
तसेच यावेळी शेख यांच्यावर पाईप उगारला, शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.