Pune Crime : मोक्का गुन्ह्यातील ‘त्या’ आरोपीला पुणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर..

Pune Crime पुणे : बालेवाडी येथील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दर्फाश करुन हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी आरोपींवर अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर मोक्का कारवाई केली होती. (Pune Crime)
मोक्का कारवाई करण्यात आलेला आरोपीला पुणे जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती ॲड. घुगे यांनी दिली.
हॅपी उर्फ यश मोहनलाल पाहूजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी बालेवाडी येथील त्रिवेणी लॉज येथे छापा टाकून त्याठिकाणी चालणाऱ्या वेश्या व्यवसाचा पर्दाफाश करुन पीडित महिलांची सुटका केली होती. याप्रकरणी आरोपी हॅपी उर्फ यश पाहूजा याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
आरोपीने ॲड. घुगे यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जवार झालेल्या सुनावणी वेळी ॲड घुगे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी हा मुख्य आरोपी नाही.
तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीमध्ये आरोपीचे नाव नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी आरोपीचा ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.