Pune Crime : धक्कादायक! प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात एका उबेर कंपनीच्या चालकाने प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकणी लोणीकंद पोलिसांनी उबेर चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (ता.१३) रात्री पवणे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान बायफ कंपनी येथील रोडवर घडला आहे.

उबेर कंपनीच्या वॅगनर कार (एमएच १२ व्हीटी ०२६२) चालक अमरिष त्रिवेदी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकणी आव्हाळवाडी येथील २५ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांनी घर बदलल्याने घरगुती सामान घेऊन आरोपीच्या कारमधून घेऊन जात होत्या. घरगुती सामान कारच्या मागील सीटवर ठेवून फिर्यादी चालका शेजारी शीटवर बसल्या होत्या. Pune Crime

बायफ कंपनी येथील भाड्याच्या घरात राहण्यासाठी सामान घेऊन जात असताना चालकाने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श केला. मात्र, चुकून स्पर्श झाला असेल असे समजून फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर आरोपीने बायफ रोड पासून काही अंतरावर अंधाराचा फायदा घेऊन तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!