Pune Crime : पुणे हादरले! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात, पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, घटनेने उडाली खळबळ..


Pune Crime : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्‌यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण माणिक महामुनी (वय.३८, रा. नागपूर) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्‌या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी किरण महामुनी पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलिस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. Pune Crime

त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली.

दरम्यान, हा प्रकार समजल्‌यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!