Pune : नव विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तब्बल १२ वर्षांनी लागला निकाल, झाली निर्दोष मुक्तता…

नव-विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी १२ वर्षांनंतर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी यांनी दयानंद रावसाहेब खानोरे (वय- ३२), अक्काबाई रावसाहेब खानोरे (वय-५५), पल्लवी लक्ष्मण कोरे (वय-२५).
बसवराज अप्पासाहेब कोरे (वय-२५), महेश लक्ष्मण कोरे (वय-२७, सर्व रा.धायरी, पुणे) या सर्वांची नव-विवाहितेचा छळ करून विवाहा नंतर पाच महिन्यांतच तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
खटल्याची हकीकत थोडक्यात- शुभांगी वय-२२ हिचा विवाह दि. १५/०४/२०१२ रोजी दयानंद रावसाहेब खानोरे वय-२५ याच्या बरोबर झाला होता. घर घेण्यासाठी रुपये पाच लाख शुभांगीने माहेरहून आणावेत असे आरोपींचे म्हणणे होते. शुभांगी पाच लाख हि मोठी रक्कम माहेरहून आणू शकत नव्हती.
म्हणून आरोपींनी शुभांगीचा छळ सुरू केला होता. दरम्यान नवऱ्याचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याचे तीला कळाले होते. म्हणून आरोपींनी शुभांगीला अजून जास्त त्रास द्यायला सुरुवात केली होती.
या सर्व त्रासाला कंटाळून व त्रास असह्य झाल्याने विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांतच दि.०७/०९/२०२४ रोजी धायरी पुणे येथील घरात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. अशी फिर्याद शुभांगीचे वडील श्री.बालगोंडा मलगोंडा चिंचने रा.धनपड ता. शिरोळ जिल्हा-कोल्हापूर यांनी दि.०८\०९\२०१२ रोजी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली होती. सरकार पक्षाने या खटल्यात चार साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. Pune
आरोपींच्या वतीने ॲड.मिलिंद द. पवार यांनी युक्तिवाद केला, रहात्या घरात प्रचंड झुरळं झाली होती. झुरळांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून घरावर किटक नाशकांचा व पेस्ट कंट्रोलचे उपचार केले होते. त्यानतर सलग चोवीस तास घर पूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु शुभांगीच्या ते लक्षात न आल्याने ती तशीच घरात झोपून राहिली. त्यामुळे रहात्या घरातच तीचा गुदमरून मृत्यू झाला.
शुभांगीने विष प्राशन केले असल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात आलेला नाही. नवरा, सासु, नणंद, दीर यांनी पैशाकरिता शुभांगीचा छळ केला हे सरकार पक्ष सिध्द करू शकलेला नाही असा युक्तिवाद ॲड.मिलिंद द. पवार यांनी केला. वरील युक्तीवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी तब्बल बारा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. ॲड. आकाश देशमुख, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी या खटल्यात मदत केली.