Pune Accident News : फूड डिलिव्हरी करायला गेला अन् घडलं भयंकर, भीषण अपघातात दोघांचा दुःखद अंत…

Pune Accident News : पुण्यात अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ११.३० पुण्यात एक भीषण अपघात झाला. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने २ जण जागीच ठार झाले. तर एक जण किरकोळ जखमी आहे.
रावसाहेब सिदाजी माने ( वय, २१ रा. रामनगर, लोणीकंद ) व राहुल मोहन डुकले ( वय १९, रा. गोरे वस्ती, वाघोली ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. Pune Accident News
मिळालेल्या माहिती नुसार, रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना राहुल मित्रासोबत दुचाकीवरुन निघाला. यावेळी दोघांच्याही दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये एक जण जागेवरच ठार झाला. तर राहुलला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर राहुलच्या मागे बसलेला तरुण किरकोळ जखमी झालाय. रावसाहेबच्या मागे आईवडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.