Pune Accident News : पुण्यात भीषण अपघात! कंटेनरची ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक, दोघांचा मृत्यू..
Pune Accident News : पुण्यातील दरी पूल, नवले पूल, तसेच भुमकर चौक या ठिकाणावर होणाऱ्या अपघातांचं सत्र काय थांबायचं नाव घेत नाहीये. आठवडा किंवा महिनाभरात या तीन पुलांपैकी कुठे ना कुठेतरी अपघात होतच असतो. आज पहाटे ४ च्या दरम्यान पुण्यातल्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर चार वाहनांचा अपघात झाला आहे.
मोठा कंटेनर चालवणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो एका लक्झरी बसला जाऊन धडकला आणि नंतर टेम्पो व एका चारचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर तो कंटेनर थेट डिव्हायडरवर जाऊन धडकला.Pune Accident News
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, याबाब साताऱ्याहून येणाऱ्या एका भरधाव कंटेनर ने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला.
या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली मात्र पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. सध्या या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे.