Pune Accident : आमदाराच्या फोननंतर धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले? आता ‘तो’ आमदारही अडकणार? घटनेला वेगळं वळण…


Pune Accident : पुणे अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याकडे केवळ राज्य नाहीतर आता देशाचं लक्ष लागलं आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपी असणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणांमधील काही अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रकारे काम करत होते, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यावेळी या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या धनिकपुत्राचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

त्यामुळे आता अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचे अंश नसल्याची बाब कायदेशीर लढाईत त्याच्या पथ्यावर पडू शकते. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ श्रीहरी हळनोर यांनी धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले आणि त्याजागी एका दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने ठेवून दिले.

त्यानंतर धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पल्स डॉ. हळनोर यानी कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिल्याचे उघड झाले होते. विशाल अग्रवाल यानेही डॉ. अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती फोन कॉल्सच्या डिटेल्समधून समोर आली आहे. Pune Accident

यानंतर आता याप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे अपघात झाल्यानंतर काहीवेळातच एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला.

या आमदारानेच डॉ. अजय तावरे यांना धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यास सांगितले का, अशी चर्चा आता सुरु आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयात मोठ्या पदावर आहेत. ते ससूनमधील प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी एक आहेत. या सगळ्यानंतर आता डॉ. तावरेंना फोन करणारा आमदार नक्की कोण,याची चर्चा रंगू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!