Pune : कोंढवा परिसरात 3788 सिम कार्ड आणि 22 वर्षाच्या तरुण एसआयटीच्या ताब्यात, धक्कादायक माहिती आली समोर..

Pune : पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले.
बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोध पथकाच्या पुणे युनिटने मिठानगर येथील अनधिकृत टेलिफान एक्सचेंज उध्वस्त केले. दूरसंचार विभागाचे अधिकारी व पंचाच्या समवेत कोंढवा येथील मिठानगरमधील एम ए काँप्लेक्स येथे हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज होते.
या कारवाईत विविध कंपन्याचे ७ सिम बॉक्स, ३७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, सिम बॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे अॅन्टीना, सीम बॉक्स कायम कार्यान्वीन्त राहावा, या करीता वापरण्यात येणारे इन्व्हर्टर, लॅपटॉप असा माल जप्त करण्यात आले आहे.
पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. Pune
पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपणीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.