पुण्यात २५ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, शरीरसंबंध ठेवायचा अन्…; घटनेची माहिती होताच महिलांना धक्काच बसला


पुणे : पुण्यात तब्बल २५ महिलांची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने फसवणूक झालेल्या महिलांना धक्काच बसला. आरोपी फिरोज निजाम शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे राहायला आहे. तो मूळचा गंगावळण, इंदापूर येथील आहे.

याबाबत एका महिलेने राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. नंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यांना या प्रकरणाची पायामुळे पुण्यात सापडली. प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली.

आरोपीला पुण्यात रविवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळत आहे. इंदापूरमध्येही फिरोज याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून फिरोजने लग्नाचे आमिष दाखवत २५ महिलांना फसवले आहे.

त्यांच्याकडून पैसे उकळल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच त्याने महिलांसोबत शारीरिक संबंधही ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून फिरोज याची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत फिरोज शेख याने काही महिलांकडून त्याने लाखो रुपये काढले असल्याचे समोर आले आहे.

एका घटस्फोट झालेल्या महिलेला फिरोज शेख याने आपल्या जाळ्यात अडकवले. दोघांचे बोलणे वाढले आणि त्याने लग्न करण्याची आमिष दाखवले. तसेच तिला भेटून शरीर संबंध देखील ठेवले. महिलेने नकार दिल्याने आपण लग्न करणार असल्याचे सांगितले. यामुळे महिलेने नकार दिला नाही.

नंतर व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिनेही घेतले. मात्र नंतर आपल्याला आजार असल्याचे सांगून टाळायला सुरुवात केली. यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याला अटक केल्यानंतर अनेक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!