प्रणिती शिंदेंना एका मोठ्या गटाचा जाहीर पाठिंबा ! सोलापूर लोकसभेत शिंदेची वाढतेय ताकदं !!

पंढरपूर : राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. काही मतदारसंघ हे यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर मतदारसंघ होय.
या मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा हा मोठा सामना रंगणार आहे. आज प्रणिती शिंदे या अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी दिलासा मिळाला आहे. प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके आणि भालके गटाच्या समर्थकांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंची ताकद वाढली आहे.
Views:
[jp_post_view]