पुणे जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, नेमकं घडलं काय? जाणून घ्या…
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2024/03/police.jpg)
पुणे : पुण्याच्या अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने त्यांनी २१ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये आता कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी याबाबत प्रशासनाने पावले उचलली आहेत. तसेच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, हा देखील गुन्हा ठरणार आहे.
तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे.
याबाबत माहिती देण्यात आली आहे. हा आदेश त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशात उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही सांगितले आहे. यामुळे पूर्व परवानगी घेऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.