समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात! जखमींची नावे आली समोर…


मुंबई : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवासी वाहतुक करणाऱ्या एका खासगी बसचा टायर फुटून झालेल्या अपघातात बस महामार्गावर पलटी होऊन बसने पेट घेऊन तब्बल २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ८ प्रवाशी बचावले आहेत.

२५ पूर्णतः जळालेले मृतदेह पुढील तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे नेव्यात आले आहे. मृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

बचावलेल्या ८ प्रवाशांवर प्राथमीक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चालक व क्लिनर य चौकशी साठी पोलीस ठाणे सिंदखेड राजा येथे नेण्यात असून इतर प्रवाशांना देऊळगाव राजा येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

जखमींची नावे पुढील प्रमाणे

चालक शेख दानीश शेख इस्माईल (रा. दारव्हा जि. यवतमाळ ), क्लिनर – संदिप मारोती राठोड (वय ३१, रा. तिवसा), योगेश रामराव गवई (रा. औरंगाबाद) साईनाथ धरमसिंग पवार (वय १९ रा. माहूर), शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा यवतमाळ), पंकज रमेशचंद्र रा. जिल्हा कांगडा, हिमाचल प्रदेश दोन जखमी प्रवाशीचे नावे कळू शकले नाही.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवाहन…

खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून सदर बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.

या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (0712-2562668) अथवा अंकुश गावंडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8860018817) यांच्यांशी संपर्क साधावा ,असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!