पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी मोठी घोषणा! आता प्रत्येकी १५ हजार रुपये मिळणार, आजपासून योजना लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे.

त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, तरुणांना सरकारकडून दरमहा १५००० रुपये दिले जातील.
मोदींनी सांगितले की, या योजनेसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असून, तरुणांना रोजगाराच्या संधी वाढवण्यास मदत करेल.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या उमेदवाराला त्या कंपनीत किमान सहा महिने सातत्याने काम करावे लागेल. त्याचबरोबर ती कंपनी (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण झाल्यानंतरच १५,००० रुपयांची प्रोत्साहनरक्कम देण्यात येईल.
मोदींनी स्पष्ट केले की, रोजगार मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी ही रक्कम थेट उमेदवाराच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे मध्यस्थ किंवा कागदपत्रांच्या विलंबाचा प्रश्न राहणार नाही.
दरम्यान, या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नोकरी मिळाल्यानंतर तुमचे पीएफ खाते सुरू झाल्यावर तुम्ही आपोआप या योजनेसाठी पात्र ठरता. सरकारकडून पात्र उमेदवारांची माहिती थेट EPFO मार्फत घेतली जाईल आणि त्यानंतर रक्कम वितरित केली जाईल.