देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा, पंतप्रधान मोदींनाही जीवे मारण्याची धमकी, पुण्यात धक्कादायक प्रकार…

पुणे : पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एक मेल आला. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे.

सोशल माध्यमावर विदेशातून मेसेज करत एकाने धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोखीम या नावाने जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीने मेसेज केला आहे.
मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी पुणे शहर पोलिस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलिस पुढील तपास करत आहेत.

Views:
[jp_post_view]