Prashant Kalbhor : पुणे कृषी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढले! प्रभारी कार्यभार प्रशांत काळभोर यांच्याकडे सुपूर्त…!!

Prashant Kalbhor उरुळीकांचन : आशिया खंडातील अर्थिकदृष्ट्या सर्वात अग्रगण्य असणाऱ्या पुणे (हवेली ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार संचालक मंडळाच्या ठरावाने काढण्यात येऊन बाजार समितीच्या कारभाराचे सह्यांचे अधिकार प्रशांत काळभोर यांना मिळाल्याने पुणे बाजार समितीच्या प्रभारी सभापतीपदाचा कार्यकाभार प्रशांत काळभोर यांना मिळाला आहे.
बहुचर्चित पुणे (हवेली ) कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक प्रभारी सचिव बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालक मंडळाच्या वतीने सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढण्यासाठी ठराव १० विरुद्ध ७ मतांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत गणेश घुले यांनी अनुउपस्थिती दर्शविली. तर संचालक रविंद्र कंद हे बैठकीतून बाहेर पडले.तर प्रशांत काळभोर यांनी सह्यांचे अधिकार देण्याचा संचालक प्रकाश जगताप यांनी ठराव मांडला.या ठरावास संचालक अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांनी अनुमोदन देऊन ठराव संमत केल्याने बाजार समितीच्या कारभाराची सूत्रे प्रशांत काळभोर यांच्याकडे आली आहेत. Prashant Kalbhor
बाजार समितीच्या बैठकीत सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा विरोधात दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे , नानासाहेब आबनावे, रामकृष्ण सातव, राजाराम कांचन व सुदर्शन चौधरी यांनी विरोधात तर गणेश घुले अनुपस्थितीत तर रवींद्र कंद यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पुणे बाजार समितीची दोन वर्षापूर्वी २३ वर्षाच्या कालखंडानंतर सार्वजनिक निवडणूक पार पडली आहे. हवेली तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर सर्वपक्षीय नेते मंडळींनी पॅनेल उभे करून १२ जागांवर बहुमत मिळविले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला अवघ्या२ जागा मिळविता आल्या आहेत.त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत बाजार समितीच्या सत्ताधारी गटात दोन गट पडले आहेत. त्यानंतर बाजार समिती व यशवंत कारखाना निवडणुकीत हे दोन गट समोरासमोर येऊन निवडणूक लढले आहेत. या दोन्ही निवडणुकीत संचालक प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांनी विरोधी गटाला धोबीपछाड देऊ केली आहे.