Prashant Kalbhor : ‘यशवंत’ मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यात वेळ घालविणाऱ्या केसरींना कारखाना समजलाच नाही! ५ वर्षे संचालक झालेल्यांना कारखाना किती क्षमतेचा असतो हे माहिती नाही; प्रशांत काळभोर यांची राहुल काळभोर यांच्यावर टिकास्त्र…


Prashant Kalbhor उरुळीकांचन : दोन हजार टनी आधुनिक कारखाना सुरू करु, केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कर्ज पुर्नरघटीत योजनेतून सरकारला लाभ मिळू़न देण्याची वल्गना करण्याऱ्या महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी यशवंत वर संचालकपदाच्या कार्यकिर्दीत कारखान्याची सर्व कॉन्ट्रॅक्ट आपल्या लोकांना देण्यात मग्नतेत घालविली, कारखान्याची गाळप क्षमता किती, असते याचा अभ्यास नसलेल्या  महाराष्ट्र केसरींना कारखाना समजला नाही असा उपरोधिक टोला आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेलप्रमुख प्रशांत काळभोर यांनी आमचे बंधू राहुल काळभोर अशी पुष्टी जोडून लगावला आहे.

प्रशांत काळभोर पुढे म्हणाले, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर यांनी कारखान्याचे संचालक असताना, केवळ कॉन्ट्रॅक्ट घेण्याकडे लक्ष दिले. थोडे कारखान्याकडे लक्ष दिले असते तर कारखाना बंद पडला नसता. भारतामध्ये चार हजार सात हजार असा कारखाण्याचा कुठलाही गळीत हंगाम होत नाही. कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करताना साडेबारा टन साडेतीन हजार, पाच हजार, साडेसात हजार, दहा हजार आणि साडेबारा हजार या प्रमाणात होतो. म्हणजे पाच वर्षे संचालक म्हणून काम केलेल्या माणसाने आपला कारखाना उभा करताना आपण किती मॅट्रिक उसाचे गाळप होते याची सुद्धा त्यांना जर माहिती नसेल तर त्यांचा कुठलाही अभ्यास नसल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकार हा बोलाची कडी अन् बोलाचीच भात अशा प्रकारचा असल्याचे काळभोर ते म्हणाले आहेत.

सोरतापवाडी (ता.हवेली) येथे अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्यावतीने बुधवारी (दि.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रशांत काळभोर बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी बाजार समितीचे संचालक लक्ष्मण केसकर , शशिकांत गायकवाड, मनोज चौधरी ,कुंजीरवाडी चे सरपंच हरीश गोठे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Prashant Kalbhor

पॅनेलचे उमेदवार मोरेश्वर काळे म्हणाले, सन २०१६ साली पांडुरंग काळे यांनी स्व.माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होत. कारखाना कसा सुरू करायचा याबाबत सतत पाठपुरावा केला. यावेळी १४९ गावांमध्ये ऊस उपलब्ध किती व मशिनरीची अवस्था कशी आहे याची माहिती घेतली. तेव्हा साधारणतः पाच लाख टन क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अहवालात समजले. मिटकॉन व बँक ऑफ इंडिया कडे कर्जासाठी दिलेले प्रस्ताव मंजूर केले. मात्र मात्र २०१७ मध्ये हा कारखाना दिवाळखोरीत गेला.

दरम्यान, राज्य शासन आजारी पडलेल्या कारखान्यांना मदत करत होते. तेव्हा राज्य शासनाने १००० कोटी रक्कम वर्ग केली. यामध्ये यशवंत साखर कारखाना होता की नाही हे सुद्धा उत्तर अद्याप एम एस सी बँकेने दिलेले नाही. ऊसतोड वाहतूकदारांचे सात ते आठ कोटी कर्ज होते. आणि बँकेचे १८ कोटी कर्ज होते. या कर्जाला मोठ्या प्रमाणात व्याज वाढवल्याने ते कर्ज फुगलेले आहे. या कारखान्याला बाहेर काढण्यासाठी निवडणूक लढविण्याची अत्यंत गरज होती. यासाठी पांडुरंग काळे यांनी निवडणूक लढविण्यासाठी पुढाकार घेतला.

कारखाना सुरु करण्यासाठी शासन व वित्तीय संस्थांची गरज लागणार आहे. या संस्था कारखान्यासाठी कर्ज देण्यासाठी तयार आहेत. कर्ज मिळाले तर प्रथम शेतकरी व कामगार यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर बँकांचे कर्ज व कारखाना सुरु करण्यात येणार आहे. कारखाना सुरु झाला तर कारखान्याला सर्व खर्च वजा करून प्रत्येक वर्ष निव्वळ ५० कोटी रुपयांचा नफा शिल्लक राहू शकतो. १०० कोटीचे कर्ज दोन ते तीन वर्षात फिटून जाऊ शकते.

संचालक मंडळ निवडून आल्यावर कारखाना कसा सुरू करायचा…

पुणे शहरापासून कारखाना १२ किलोमीटर अंतरावर आहे. कारखान्याला २५८ एकर जमीन आहे. कारखान्याची व्हॅल्युएशन खूप मोठे आहे. ते साधारण ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आजारी कारखाने सुरू करण्यासाठी केंद्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या सहकार खात्याच्या माध्यमातून कारखान्यांना साधारण २०० कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे इथेनॉलचे ब्लीडिंग सध्या ११ ते १२ टक्के आहे ते २० टक्क्यांपर्यंत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विचाराधीन आहेत.

हे जर २० % ब्लेजिंग झाले तर आपल्या परिसरातील एचपीसीएल बीपीसीएल आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांना आपण इथूनच पुरवू शकतो. ज्युसी इथेनॉल केला तर आपल्याला ६८ ते ६९ रुपये प्रति लिटर भाव मिळेल आणि शासनाने मदत केली तर आपला हा कारखाना सुव्यवस्थेत सुरू होऊ शकतो आणि आपण शेतकरी कामगार व बँकांचे देणे देऊन कारखाना लवकरच सुरू करू शकतो असे मोरेश्वर काळे यांनी कारखान्याचे भविष्यातील प्रयत्न सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!