Prakash Shendge : दौंडमध्ये राजकीय वातावरण तापलं! प्रकाश शेंडगे यांनी टाकला डाव, आमदार राहुल कुल यांचे टेंशन वाढले, नेमकं काय झालं?


Prakash Shendge : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्यातील १६० मराठा आमदारांना आगामी विधानसभेत पाडणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच त्यांनी त्याची सुरुवात करताना दौंडचे सत्ताधारी आमदार राहुल कुल हे हिटलिस्टवर आहेत. आमचं ठरलंय, दौंड चा आमदार पाडायचाय असे म्हणत शेंडगे यांनी कुल यांचे टेंशन वाढवले आहे.

प्रकाश शेंडगे यावेळी बोलताना म्हणाले की, इंदापूर येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मी दौंड चा आमदार पाडणार असे जाहीर केले होते. शेंडगे यांनी स्वर्गीय काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव अनंत थोरात यांच्याकडे बोट दाखवत, आता आमचं ठरलंय, दौंड चा आमदार पाडायचा आहे. असे म्हणत जणू काय आनंद थोरात यांच्या आगामी विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा करत आमदार कुल यांना एक सूचक इशारा या निमित्ताने दिला.  Prakash Shendge

दौंड तालुक्यातील अनेक गावागावात त्यांनी घोंगडी बैठका घेत ओबीसी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नातून ओबीसी बहुजन पार्टीने माळी समाजाचा ओबीसी चेहरा महेश भागवत यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देत सत्ताधारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले आहे.

एकेकाळी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना मानणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले महेश भागवत आणि आनंद थोरात हे दोन ओबीसी नेते हे आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. आमदार कुल यांच्यामुळे भागवत आणि थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महेश भागवत आणि आनंद थोरात या दोन ओबीसी शिलेदारांमुळे आमदार कुल हे विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करु शकले. आमदार कुल यांच्या गळ्यात विधानसभा निवडणुकीत विजयाची माळा घालण्यात भागवत आणि थोरात यांचा मोठा वाटा आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आरक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेले ओबीसी चेहरे आता आगामी विधानसभेचे पारडे फिरवू शकतात, याचा अंदाज आता येऊ लागला आहे.

त्यामुळे दौंड तालुक्याला तिसरा सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो अशी खात्री आता वाटू लागली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी या निमित्ताने धनगर समाजाचा उमेदवार आगामी विधानसभेत देणार असल्याची एक प्रकारे घोषणा केली‌.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!