Prakash Mhaske : काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये, तुमचे भ्रष्टाचाराचे ५० पुरावे देऊ, माझे पण द्या प्रकाश म्हस्के यांचे प्रकाश जगताप यांना जाहीर आव्हान…!!

Prakash Mhaske उरुळीकांचन : खरेदी विक्री संघाची जागा विक्री केल्याचा आरोप करणाऱ्यांनी खरेदी विक्री संघाची जागा ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहभागीदारीत विकसित झाली आहे हे खरे वास्तव लोकांना सांगावे, खरेदी विक्री संघात आज ७० लाखांच्या ठेवी आहेत. हे सत्य पण लोकांना समजले पाहिजे, सिटीझन बॅक बुडवली म्हणणाऱ्यांनी त्यांचे गुरु प्रताप गायकवाड यांचा महाठक मित्र सुभाष खाबीया व बॅक व्यवस्थापक विलास खांदवे यांना कर्ज देण्याची शिफारस केल्याने बॅक अर्थिक अडचणीत आणण्याचे काम झाले, बँक अभ्युदय बँकेत विलीन झाल्याची स्पष्टोक्ती देऊन आपल्याकडे ६ एकराची १०० एकर कशी झाली? त्याचे पन्नास पुरावे माझ्याकडे असून स्वत: हा काचेच्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नये असा इशारा प्रकाश म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांना दिला आहे.
लोणी काळभोर येथे अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रकाश म्हस्के यांनी ही टीका केली. यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, कमलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश म्हस्के पुढे म्हणाले, १८ वर्षे बंद असलेला हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे कर्ज फेडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार १२ गुंठे जागा विकसित केली आहे. त्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज फेडले आहे. सध्या संघाकडे ७० लाख रुपयांच्या ठेवी असून एक रुपयाही कर्ज नाही. मी सिटीझन बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळी ५१ लाख रुपयांची ठेव व ७ शाखा होत्या. माझा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपला त्यावेळी शाखांची संख्या ही वाढली होती व ठेवी १६१ लाख रुपये होत्या. त्या नंतर प्रकाश म्हस्के यांचे गुरु प्रताप गायकवाड यांनी माझ्या एका सहकाऱ्याला कर्ज मिळावे म्हणून शिफारस केली. सुभाष खाबिया नामक या ठगाने कर्जाची फेड न केल्याने तसेच बँक व्यवस्थापक विलास खांदवे यांच्या गैरव्यवहारामुळे बँक अडचणीत आली. व शासकीय निर्णयामुळे अभ्युदय बॅन्केत विलीन झाली. त्या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत असा खुलासा त्यांनी केला. Prakash Mhaske
प्रकाश म्हस्के पुढे म्हणाले, मी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाल्यानंतर प्रकाश जगताप हे जेंव्हा सभापती झाले त्यावेळी शेतक-यांसाठी सुरु केलेले वाचनालयाची १ कोटी रुपये किमतीची ६०० स्क्वेअर फूट जागा स्वतः च्या मेव्हण्याला दिली. बाजार समिती समोरील ४ कोटी रुपयांची ३००० स्क्वेअर फूट जागाही मेव्हण्याला दिली आहे. मांजरी येथील बाजारासाठी ५ एकर जागा ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने विकत घ्यायचे तत्कालीन संचालक मंडळाने ठरवले होते. मात्र सभापती प्रकाश जगताप यांनी ११० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने हि जागा खरेदी केली. या व्यवहारात बाजार समितीला २५ वर्षांपूर्वी ६७ लाख रुपये नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीच्या गेटचे ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने एका मेव्हण्याला दिले ठरलेल्या कामाचे प्रकाश जगताप यांनी ४२५ रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने मेव्हण्याला पैसे काढून दिले.
सहा महिन्यांपूर्वी बाजार समितीत पार्किंगच्या टेंडर मध्ये किती पैसे खाल्ले ? मच्छी बाजार तयार करण्यासाठी ३५ व्यापा-यांकडून किती पैसे घेतले आहेत याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. किकची स्प्रिंग तुटलेल्या दुचाकी वापरणा-या व्यक्तीने असे कोणते व्यवसाय केले त्यामुळे २५ वर्षांत तुमची आर्थिक परिस्थिती ६ एकरावरुन १०० इतकी झाली.
२७२ बोगस मतांमुळे बाजार समितीत पराभव…
प्रकाश म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांच्या ताब्यातील ४ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था थकबाकीत आहेत. त्या संस्था व्यवस्थित, नफ्यात चालवा असे आव्हान त्यांना केले मग यशवंत कारखाना चालवायचे स्वप्न बघा. मागील बाजार समिती निवडणुकीत तालुक्यातील ज्याठिकाणी शेतकऱ्यांना जमीन नाही अशा भागातील सोसायटी संचालक प्रत्येक सोसायटीत करुन २७२ सभासदांमुळे तुम्ही परत बाजार समितीत निवडून आला. असाही त्यांनी आरोप लगावला.