Prakash Ambedkar : …तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील!! पुणे अपघात प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य


Prakash Ambedkar : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केलेत. विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला?, विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे?, याचा खुलासा झाल्यास विशाल अग्रवालला वाचवणार नावे समोर येतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

ते अकोल्यात बोलत होते. बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा जोपर्यंत होत नाहीय तोपर्यंत अशी प्रकरण घडतच राहतील. याप्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर काहीही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारा डॉ. जोंधळे यांनाही अस फरपटत नेले. डॉ. जोंधळेंचे नावच कुठेही येत नाही, त्यांनाही असे मारण्यात आले आहेत.

त्यामुळे असे मानतो की, त्याच्या मागे राजकारण जे काही असेल पण हा वाहनचालकांचा निष्काळजीपण आहे, त्यालाही कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे. कारण आई- बापांचा मुलांवर कोणतेच नियंत्रण राहिले नाही. असे एकंदरीत दिसते . त्यामुळे कडक कायदा येणे आवश्यक आहे. अल्पवयीन असो की प्रौढ त्यासंदर्भात कडक कायदा येत नाही, या प्रकाराला आळा बसणार नाही. Prakash Ambedkar

विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे?, अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला?, याचा खुलासा झाला तर त्याला वाचवणारी सर्वच नाव समोर येणार आहेत. अजित पवारांवरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नाही. सध्या पोलीस सांगतात त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!