Prakash Ambedkar : विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार, प्रकाश आंबेडकर यांचे मोठं वक्तव्य…

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यानंतर त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
फेसबुकवरती एक व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. माझ्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झालेली आहे. डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे.
विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. Prakash Ambedkar
दरम्यान, ते पुढे म्हणाले, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे.
विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.