आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत महत्वाची माहिती आली समोर, मोदी सरकारने दिली कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी..


नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला. १६ जानेवारी २०२५ रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. आता याच आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळालेली असेल एक तरी देखील अजून आठवा वेतन आयोग स्थापित झालेला नाही. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती अजूनही रखडलेली आहे.

यामुळे, आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमकी कधी होणार ? हा मोठा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत असून आता याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने स्थापित होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नॅशनल कौन्सिल म्हणजे JCM च्या कर्मचारी पक्षाने 8व्या केंद्रीय वेतन आयोगासाठी मेमोरेंडम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

दरम्यान, यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला गती मिळणार असून लवकरच याची स्थापना होईल आणि प्रत्यक्षात वेतन आयोगाच्या माध्यमातून काम सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आठ नऊ दिवसांपूर्वी म्हणजेच 17 एप्रिल 2025 रोजी एक महत्वाचे सर्क्युलर काढले होते.

यामध्ये 8व्या वेतन आयोगासाठी 35 पदांवर डेप्युटेशनद्वारे नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. यावरून अद्याप आयोग औपचारिकरित्या गठीत झाला नसला, तरी तयारी जोमात सुरू झाली असल्याचे दिसलें. दरम्यान आता आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

ते पाऊल म्हणजे २२ एप्रिल रोजी झालेल्या JCM च्या विस्तारित बैठकीत किमान वेतन, पे स्केल, फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शन लाभ यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी ती म्हणजे या मेमोरेंडमसाठी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून AIRF, NFIR, AIDEF, INDWF, BPMS, CDRA, ITEF यांसह इतर महत्त्वाचे कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत.

जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, समितीची जूनमध्ये महत्वाची बैठक होणार आहे आणि समिती निवेदन तयार करणार आहे. हे निवेदन सर्व घटक संघटनांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर अंतिम केले जाणार आहे.

दरम्यान, या सर्व संघटनांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत प्रतिनिधींची नावे देण्यास सांगण्यात आले असून 20 मेपर्यंत सर्व सूचना PDF आणि Word फॉरमॅटमध्ये पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. यावरून लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!