Prabha Atre : मधुर आवाज हरपला! पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन…


Prabha Atre : प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय ९२ वर्षे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीतात एक जबर गायिका होत्या. त्यांनी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेतले आणि लवकरच त्यांनी एक उत्कृष्ट गायिका म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

त्यांनी गायनाच्या मैफिलींमध्ये भाग घेतला आणि त्यांनी अनेक शास्त्रीय संगीत गायनाचे अल्बम देखील रेकॉर्ड केले. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण या तीनही प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. Prabha Atre

प्रभा अत्रे यांचे निधन हे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचे एक दिग्गज गायक गमावले आहे. त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि उत्कृष्ट गायन कौशल्येने भारतीय शास्त्रीय संगीताला एक नवीन उंची दिली. त्यांचा जन्म जन्म १९३२ मध्ये पुण्यात झाला. त्या रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.

तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय कालिदास सन्मान, टागोर अकादमी रत्न पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, हाफिज अली खान आदी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!