मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत, थेऊरफाटा येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न


लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत एक दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे थेऊरफाटा येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 138 नव-कुक्कुटपालक शेतकरी उद्योजकांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत विविध कुक्कुटपालन विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाबाबत शास्त्रोक्त माहिती, व्यवस्थापन पद्धती, संगोपन, खाद्य व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना तसेच शासनाच्या योजनांची माहिती या प्रशिक्षणातून देण्यात आली.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

या प्रशिक्षण शिबिरास आमदार ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य अमोल टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जी. बी. चौधरी, थेऊरचे मा. उपसरपंच भरत कुंजीर, स्वप्नील कुंजीर, रूपचंद बोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी, शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीसोबत पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळून आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करावेत. तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी व ग्रामीण भागात पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत आमदार कटके व्यक्त केले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल, आमदार कटके यांनी सभापती युवराज काकडे यांचे कौतुक केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!