Pooja Khedkar : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर गायब? फोनही बंद, महत्वाची माहिती आली समोर..

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गायब झाल्याची शंका आहे.

वाशिमहून पुण्यात आलेल्या पूजा खेडकर या त्यांच्या बंगल्यात नाही आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी पोलिसांना आकरा वाजेची वेळ दिली होती. मात्र त्या हजर देखील राहिलेल्या नाहीयेत. पूजा खेडकर यांनी आपला फोन देखील बंद केला आहे.
पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने त्या गायब झाल्याची शंका आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. Pooja Khedkar

तसेच तुमची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर या गायब झाल्याची शक्यता आहे.
