Politics News : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! महायुतीचे ९ बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजपला मोठा धक्का…

Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या दिशेने नेत्यांचे वळण अधिक स्पष्ट होत आहे. महायुतीतील अनेक बडे नेते आता महाविकास आघाडीकडे वळू शकतात, असा दावा केला जात आहे.
तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक, बापू पठारे आणि मदन भोसले यांचा समावेश आहे. अकलूज येथील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांसह अनेक नेत्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरू आहे.
महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. Politics News
भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यत्वासाठी संपर्क साधला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एक मजबूत समर्थन मिळू शकते.
महाविकास आघाडीमध्ये हे नेते होणार सामील..
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात .
माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
पंढरपूरचे प्रशांत परिचारक हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात .
सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक साळुंखे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
सातारा जिल्ह्यातील वाई – खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापू पठारे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात .
कोल्हापूरचे राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.