राजकारण तापलं! ठाण्यात नाईकांकडून ‘रावण’ वक्तव्य चर्चेत, एकनाथ शिंदेवर निशाणा?


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राजकारण चांगलेच रंगू लागले आहे.अशातच आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात घेरण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. ठाण्यात सत्ता मिळवायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करणे अपरिहार्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक यांची ही टीका थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीसोबत भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना ही शिवसेना शिंदे गटाने आपल्या सोयीनुसार केल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यानंतर आता गणेश नाईक यांच्या वक्तव्याने ठाणे महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!