Politics : काँग्रेसला धक्यावर धक्के! अशोक चव्हाण यांच्यानंतर ‘या’ बड्या नेत्याचा देखील पक्षाला रामराम…
Politics : काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी आमदार अमर राजूकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. राजूरकर नांदेड जिल्ह्यातील असून ते चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.
मी आज दिनांत 12/02/2024 पासून अध्यक्ष, नांदेड शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटी व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदे काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे. धन्यवाद. असं अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर अमर राजूरकर यांनी देखील कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षात त्यांच्याकडे पक्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. नांदेड जिल्हा क मिटीचे सदस्य देखील ते राहिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोण कोण राजीनामा देणार? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान, चचेंबुरचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, उमरेडचे आमदार राजू पारवे, पश्चिम नागपुरचे आमदार विकास ठाकरे, नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे, चंद्रपुर, राजूराचे सुभाष धोटे, रिसोड वाशिमचे अमित झनक हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, विधान परिषदेचे आमदार अमर राजुरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत आल्याची माहिती आहे.