राजकीय क्षेत्रात खळबळ! जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात, देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं…

मुंबई : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. एका महिलेने त्यांच्यावर आरोप केल्याचे सांगितले जात आहे. आता आज
जयकुमार गोरे आरोप प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या आरोपींचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी फोन कॉल केले. आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले असून यात सगळे लोक शरद पवार गटाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले आहेत. यात सगळे लोक शरद पवार गटाचे लोक आहेत. प्रभाकरराव देशमुख, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स आहेत. त्यांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना कॉल केले आहेत आणि नंतर त्याने व्हिडिओ करून यांना पाठविले आहेत. या सर्वांची चौकशी होणार असल्याचेही ते म्हणाले.
एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण योग्य नाही. 2017 साली ही घटना घडली. त्यावेळी ते आमच्यासोबत नव्हते. दोषी आहेत की नाही, यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अनेक संवाद टेप केलेले आहेत. असेही ते म्हणाले.
यामध्ये हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला. हा ब्लॅकमेलिंग चा प्रकार होता. त्याला हवा देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या. हे सगळं नेक्सस होते. तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्युबर आहे. जयकुमार गोरेंनी पहिली तक्रार केली.
नंतर विराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली आणि त्यानंतर तिसरी उमेश मोहिते यांनी तक्रार केली. याबाबत आता सगळी चौकशी होणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यावर रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.