राज्यात लवकरच राजकीय भूकंप!! ऑपरेशन 272 मध्ये आता ठाकरे अन् पवारांचे खासदार, मंत्रिपदेही ठरली?


नवी दिल्ली : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. २०१४ आणि २०१९ मधील असलेला बहुमताचा आकडा भाजपाकडे नाही. त्यामुळे भाजपाला मोठे निर्णय घेताना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजपा आपले बहुमत वाढवण्याकडे लक्ष देत आहे. यामुळे अजून बरेच पक्ष भाजपच्या सत्तेत सहभागी होतील असे सांगितले जात आहे.

यामुळे आगामी काळात कोणता पक्ष फुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या निर्णयावर अवलंबून रहावे लागत आहे. विश्वासू मित्रपक्षांचे बळ वाढवण्याकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आता कोणता पक्ष फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ठाकरे आणि पवार यांचे १/३ खासदार फोडण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठे बदल दिसतील.

सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. सुनिल तटकरे यांनी पवार गटाच्या ७ खासदारांना संपर्क साधला होता. पण दिल्ली विधानसभेत यश मिळाल्यास इतर पक्षातील खासदार स्वतः आपल्याकडे येतील अशी आशा भाजपाला आहे. यामुळे सगळं गणित तिथंच अवलंबून आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. तसेच अनेकजण सत्तेत जाण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लवकरच भूकंप होईल असेही बोलले जात आहे.

केंद्रात सध्या चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चे प्लॅनिंग केले जात आहे. यामुळे याचा मुहूर्त कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!