पिंपरी हादरली! तरुण आणि महिलेची लॉजमध्ये गुपचूप भेट; नंतर समोर आला धक्कादायक प्रकार..


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. यश कदम असे या मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश कदम सोमवारी एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर तो खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, प्राथमिक तपासात संबंधित तरुणासोबत त्या दिवशी लॉजमध्ये एक महिला उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. लॉजमध्ये असताना दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचेही समोर आले आहे.

या घटनेचा आणि त्या वादाचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. सध्या निगडी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!