हवेली तालुक्यातील ४० गावांतील रिक्त पोलिस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर…!


उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील पोलिस पाटील पदासाठी मंजूर १०२ पदांपैकी रिक्त व गाव पोलिस पाटील पदासाठी पात्र ठरलेल्या ४० गावांसाठी शुक्रवार ( दि.१) रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी( प्रांत ) संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली हवेली तहसिल कार्यालयात ४० गावांची पोलिस पाटील आरक्षण प्रक्रिया पार पडली.

याप्रसंगी हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार नाथाजी सकट , सचिन आखाडे, स्वाती नरुटे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रतिनिधी श्रीकांत माने, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व्ही.पी.माने यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

पोलिस पाटील आरक्षण सोडतीत २०११ च्या जातिनिहाय लोकसंख्या ग्राह्य धरुन गावनिहाय लोकसंख्येच्या आधारे शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली आहे.

पोलिस पाटील आरक्षण सोडतीत अणुसूचित जाती, अणुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जाती ‘अ’.वर्ग ,भटक्या जमाती वर्ग ‘ब’, भटक्या जमाती वर्ग ‘क’, भटक्या जमाती वर्ग ‘ड’, विशेष मागासवर्ग , इतर मागास वर्ग, अर्थिकदृष्ट्या दुर्बल, खुला वर्ग असा प्रवर्गात आरक्षण सोडत काढण्यात आली. तर तालुक्यात शासन स्तरावर पोलिस ठाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पेरणे व केसनंद गावांना सोडतीतून वगळण्यात आले आहे.

अणुसूचित जाती – कोंडवे धावडे (महिला ) सुतारवाडी , नांदेड, नऱ्हे

अणुसूचित जमाती
सांबरेवाडी(महिला) , सांगवी सांडस (महिला) शिवणे,नायगाव
कोपरे, तुळापूर

भटक्या विमुक्त जाती *अ
शिंदवणे (महिला ) तरडे,
तळेरानवाडी

भटक्या जमाती विमुक्त ब
सोरतापवाडी (महिला)
, मांगडेवाडी, मांडवी ब्रुद्रुक

भटक्या जमाती ‘क’
खामगावटेक(महिला ),हिंगणगाव
*वडगाव शिंदे

भटक्या जमाती ‘ड’
डोणजे

विशेष मागास प्रवर्ग
तानाजीनगर (महिला)
मांडवी खुर्द

इतर मागास प्रवर्ग
मांजरी खुर्द (महिला),शिरसवडी
गोगलवाडी’ गाऊडदरा

अर्थिकदृष्ट्या दुर्बल
आगळंबे(महिला) किन्हई, सणसनगर,सांगरुण

खुला प्रवर्ग
प्रयागधाम( महिला), शिंदेवाडी (महिला ) अवसरेनगर (महिला )
आंबी, मोगरवाडी, मन्यारवाडी बहुली, येवलेवाडी, होळकरवाडी, थोपटेवाडी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!