पंजाबमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरताना तुफान हाणामारी ; पोलिसांचा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हवेत गोळीबार ….


फिरोजपूर :  पंजाबमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत फिरोजपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरताना आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तर परिस्थिती एवढ्यावरच न थांबता दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. या हाणामारीत माजी आमदार कुलबीर सिंह झिरा यांच्यासह ८ जण जखमी झाले.

सुरक्षा दलाचे नेतृत्व करणारे एसपी (मुख्यालय) फाजिल्का रमनीश चौधरी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.

शहरातील एका शाळेत २०० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवारांची मोठी रांग लागली होती. हाणामारी होण्याची शक्यता पाहता याठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी आमदार कुलबीर सिंग झिरा यांचे शेकडो समर्थक मोगा रोडवरून क्लॉक टॉवरकडे कूच करत होते. पोलिसांनी कुलबीर सिंग झिरा समर्थकांना क्लॉक टॉवर चौकाजवळ अडवले, तर चौकाचौकाच्या फिरोजपूर बाजूला आमदार नरेश कटारिया यांचे पुत्र शंकर कटारिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखताच आम आदमी पार्टीचे लोकही पोलिसांच्या समर्थनार्थ पुढे आले, त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या लोकांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान काँग्रेस आमदारांच्या समर्थकांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली आणली, ज्यातून अचानक दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ती दगडफेक  करत पुढे सरकली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली, हे  पाहून पोलिसांनी आधी पाण्याचा फवारा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीनमध्ये बिघाड असल्याने त्यांनी हवेत गोळीबार करून दगडफेक करणा-या लोकांना हुसकावून लावले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!