पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा गुन्हेगारांना थेट इशारा! म्हणाले, अवैध धंदे केले तर 7 पिढ्या लक्षात राहील अशी कारवाई करू…


पुणे : संघटीत टोळक्यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नव्या वर्षात पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. ज्यांना मस्ती आली असेल, बेकायदेशीर धंदे करुन पैसे कमवत असतील, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन, घरे खाली करायला लावत असतील तर कारवाई करू असे ते म्हणाले.

तुम्ही कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा. सापडला तर तुमच्या ७ पिढ्यांना आठवण राहिल अशी कठोर कारवाई करु, अशा शब्दात गुन्हेगारांना इशारा दिला आहे. यामुळे गुन्हेगारांना थेट इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच ते म्हणाले, पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम घेतला. परिमंडळ ५ प्रमाणे इतरांनी त्यांच्याकडील मुद्देमाल नागरिकांना परत करावा. अमितेशकुमार यांनी गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यानंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुख गुन्हेगारांना बोलावून त्यांना दम दिला होता.

त्यानंतर वानवडी येथील मुद्देमाल वितरण कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व गुन्ह्यांचा शोध लावण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहरात गुन्हेगारी कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच ते म्हणाले,तुम्हाला आपल्या आजू बाजूला कोठे गैर कृत्य, अवैध धंदे सुरु असताना दिसत असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा, पोलीस स्टेशनला किंवा ११२ वर फोन करुन कळवा, आम्ही नक्की कारवाई करु. विश्वास ठेवा, एकदा, दोनदा, किती वेळा फोन केले आम्ही तेथे कारवाई करु.

चोरीच्या वस्तू परत मिळालेल्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काही महिलांना गहिवरुन आले चोरीला गेलेली वस्तू पुन्हा मिळणार नाही असे लोक सांगत असतानाच पोलिसांनी शोधून दिल्या याचे समाधान व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group