शरीरसुखाची मागणी मान्य केली नाही म्हणून PMPL महिला कंडक्टर निलंबित, महिलेकडून कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यातील घटना….


पुणे : येथील महानगर परिवहन महामंडळात (PMPL) काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डेप्युटी चीफ मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या कार्यालयातच हा आत्महत्येचा प्रयत्न झाला. या महिलेने भयंकर खुलासा केला आहे.

कुसाळकर यांनी शारिरीक सुखाची मागणी केली आणि त्याला नकार दिल्याने आपल्याला निलंबित करण्यात आल्याचा आरोप महिला कंडक्टरने केला होता. याबाबत तपास सुरू आहे. छळाला आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवामुळे अस्वस्थ झालेल्या महिलेने कुसाळकर यांच्या केबिनमध्ये स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला.

येथील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमुळे मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण घटनेमुळे कार्यालयात काहीवेळ मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत पोलिसांनी तपास करण्याचे आश्वासन दिलं आहे. या घटनेने पुणे PMPL महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे या घटनेचा सखोल अभ्यास करून याबाबत तपास करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेवर अजून कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी याबाबत आरोपीला वाचवले जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात तपास कसा होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!