PM Narendra Modi : शरद पवारांनी ६० वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं?, अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा टोला..
PM Narendra Modi अहमदनगर : विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे. PM Narendra Modi
मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारणच केले आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेला नेता. व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, मात्र मागच्या ६० वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? असा प्रश्न यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. PM Narendra Modi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं मात्र २०१४ नंतर हे चित्र बदलले. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केले , असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
तसेच ६० वर्षांच्या कार्यकाळात शरद पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. दुसरीकडे आमच्या सरकारने सात वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
२०१४ च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ५०० ते ६०० कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, असे ते म्हणाले.
शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेक महिने पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये खूप शक्ती आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. राज्यामध्ये अनेक विकासकामे सुरु झाले आहेत. अनेक विकास कामे पूर्ण झाले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ट्रान्सपोर्ट सेवेसंबंधी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. भारताला आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे, असे मोदी म्हणाले आहे.