PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल, जड वाहनांना प्रवेश बंद, जाणून घ्या…
PM Modi : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात होणार आहे या दौर्यामध्ये त्यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे.
त्यामुळे या काळात शहरात प्रवेश करण्यास जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात येत आहे़, असे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे. PM Modi
ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक प्रवेश बंद, पर्यायी मार्ग : ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळण घेऊन निलायम पुलाखालून सिंहगड रोड वरुन इच्छित स्थळी जातील.
बाबुराव घुले पथ पथावरुन टिळक कॉलेजचे पुढे आंबील ओढा जंक्शनकडे प्रवेश बंद, पर्यायी मार्ग : टिळक कॉलेज चौकामधून उजवीकडे वळून जॉगर्स पार्क रोड वरुन शास्त्री रोडवरुन इच्छित स्थळी जावे. साने गुरुजी पथ : टिळक रोड जंक्शन ते निलायम पुलापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.
१२ नोव्हेबर रोजी मध्यरात्री पासून ते २४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास प्रवेश बंद …
सोलापूर रोड – भैरोबा नाला चौकाचे पुढे
नगर रोड – खराडी बायपास चौकाचे पुढे
आळंदी रोड – बोपखेल फाटा चौकाचे पुढे
जुना मुंबई महामार्ग – हॅरीस पुलाच्या पुढे
औंध रोड – राजीव गांधी पुलाचे पुढे
बाणेर रोड – राधा हॉटेल चौकाचे पुढे
पाषाणरोड – शिवाजी पुतळा चौकाचे पुढे
पौड रोड – पौड फाटा चौकाचे पुढे
कर्वे रोड – वारजे पुलाचे चौकाचे पुढे
सिंहगड रोड – वडगाव पुल चौकाचे पुढे
सातारा रोड – मार्केट यार्ड जक्शंन पुढे
सासवड रोड – (बोपदेव घाट मार्गे) : खडी मशीन चौक पुढे कोंढवा कडे
सासवड रोड – मंतरवाडी फाटा पुढे हडपसरकडे
लोहगाव रोड – पेट्रोल साठा चौकाचे पुढे ५०९ चौकाकडे