गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण, ‘या’ तारखेकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष…


मुंबई : शेतीची मशागत पूर्ण झाली असून आता पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर असल्याने बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप केंद्र सरकार किंवा कृषी मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

काही चर्चांनुसार, हा 23 वा हप्ता 18 जूनच्या आसपास जमा होऊ शकतो. याआधी 13 मार्च रोजी 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 2024 मधील 17 वा हप्ता देखील 18 जून रोजी वितरित झाल्याने यंदाही त्याच तारखेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत कृषी मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत निश्चित तारीख सांगता येणार नाही.

शेतकऱ्यांनी आपला हप्ता स्टेटस कसा तपासावा?

शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Farmers Corner” मध्ये “Know Your Status” पर्याय निवडून आपली माहिती तपासावी. e-KYC, बँक तपशील किंवा लँड सीडिंगमध्ये त्रुटी असल्यास त्या तात्काळ CSC केंद्रावर जाऊन दुरुस्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!