Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! पैशासाठी विवाहितेचा छळ, खडकवासला धरणात ढकलून देण्याचाही प्रयत्न, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल..
Pimpri Chinchwad Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
घरबांधणीसाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यास सांगून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खडकवासला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय विवाहितेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पती अतुल भानुदास गुंजाळ (वय. ३५), सासरे भानुदास आण्णासाहेब गुंजाळ, सासु लक्ष्मी भानुदास गुंजाळ (वय.५६ तिघे रा. विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व पती हे पतीपत्नी आहेत. आरोपींनी संनमत करुन फिर्यादी यांना घरबांधणीसाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यास सांगून महिलेला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी पती अतुल गुंजाळ याने महिलेला फ्लॅटच्या गॅलरीमधून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. Pimpri Chinchwad Crime
तसेच खडकवासला धरण परिसरात फिरायला घेऊन जावून महिलेला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.