पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून 2 पिस्तुलांचे परवाने रद्द, चौफुला अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणी कारवाई…


पुणे : भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्या कथित गोळीबार प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठी कारवाई करत दोन परवानाधारक पिस्तुलांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परवानाधारी शस्त्राचा गैरवापर करणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अंबिका कला केंद्र, चौफुला (यवतजवळ) येथे २१ जुलैच्या रात्री घडलेल्या या प्रकरणा राजकीय वर्तुळाच मोठे वादळ उठले होते. या ठिकाणी बाळासाहेब मांडेकर यांनी गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर लगेचच यवत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बाळासाहेब मांडेकर यांनी माफीदेखील मागितली होती. दरम्यान, या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई 21 जुलै रोजी यवतजवळील अंबिका कला केंद्रात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. त्या रात्री बाळासाहेब मांडेकर यांनी गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर लगेचच यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परवानाधारी शस्त्राचा अशा प्रकारे वापर करणे हे शस्त्र कायद्याचे उल्लंघन असून सार्वजनिक शांततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

       

घटनेतील पुरावे आणि परिस्थितींचे विश्लेषण करून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी गणपत जगताप यांच्या शस्त्र परवान्याबाबतचा अहवाल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना पाठवला होता. त्यानंतर तपास आणि सर्व माहितीचा सखोल आढावा घेऊन आयुक्तालयाने दोन्ही परवानाधारी पिस्तुलांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या मते, या घटनेने समाजात चुकीचा संदेश गेला असून, परवानाधारी शस्त्रांच्या वापराबाबत अधिक कडक पावले उचलण्याची गरज आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित सर्व बाजूंची चौकशी करण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात झालेल्या गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गणेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. अटक झालेल्या आरोपींपैकी एक हा कुख्यात गुंड कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे पुणे आणि आसपासच्या भागातील वाढत्या गुन्हेगारीविषयी नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. परवानाधारी शस्त्रांच्या गैरवापराबाबत पोलिसांनी घेतलेली कठोर भूमिका आणि टोळीयुद्धावर वाढलेले नियंत्रण हे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचे मानले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!