Pimpri Chinchwad : ड्रीम ११ वर दीड कोटी जिंकले अन् आता सगळंच गमावून बसले, पीएसआय सोमनाथ झेंडेंवर मोठी कारवाई

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिकले. ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. या संबंधित आता मोठी माहिती समोर आली. पीएसआय सोमनाथ झेंडे यांना अखेर निलंबन करण्यात आले आहे. Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमधील वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. Pimpri Chinchwad
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी इंग्लंड-बांग्लादेश सामन्यादरम्यान ड्रीम-११ च्या ऑनलाइन गेममध्ये अव्वल क्रमांक मिळवून दीड कोटींचं बक्षीस जिंकले. सुरुवातीला झेंडे यांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, खात्यावर पैसे जमा होत असल्याने त्यांना खात्री पटली. त्यांनी तातडीने ही आनंदाची बातमी कुटुंबियांसह मित्रमंडळींना दिली.
बघता-बघता झेंडे यांनी दीड कोटींचे बक्षीस जिंकल्याची माहिती संपूर्ण राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी फोन करुन तसेच सोशल मीडियावरुन झेंडे यांचे अभिनंदन केले.
याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर पाणी फेरणारी ठरली. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्यांना निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.