ऑनलाइन डेटसाठी मुलींचे फोटो, एक ठरली, पैसे भरले, शिवाजीनगरला हॉटेलमध्ये गेला आणि भलतंच घडलं, पुण्यातील घटना


पुणे : पुण्यात आलिशान हॉटेलमध्ये मुलींना ‘डेट’ वर भेटायचे असेल, तर अकाउंट लॉग-इन, बुकिंग, नोंदणी अशा बहाण्यांनी सायबर चोरट्यांनी एका तरुणाला जाळ्यात ओढून फसवले आहे. या सायबर चोरट्यांनी खडकमाळ आळीतील तरुणाला एक लाख ३५ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.

चोरट्यानी या तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळले. तक्रारदार तरुणाने एमबीए केले असून, सध्या तो बेरोजगार आहे. त्याला मोबाइलवर एका डेटिंग वेबसाइटवरून मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्याने संपर्क केला असता, सायवर चोरट्यांनी बुकिंग, अकाउंट लॉग-इन, रजिस्ट्रेशन अशा विविध बहाण्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले.

त्याला काही मुलींची छायाचित्रे पाठवून शिवाजीनगर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये डेटिंगसाठी बोलावले. मात्र, तिथे त्याला कोणीही भेटले नाही. त्यानंतर तक्रारदार तरुणाने पुन्हा त्याच वेबसाइटवरच्या आणखी एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून डेटिंगबाबत विचारणा केली. त्यावर सायबर चोरट्यांनी पुन्हा नोंदणीसह विविध कारणे सांगून तरुणाकडून पैसे उकळले.

नंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार तरुणाने सायबर पोर्टलवर दोन तक्रारी देत खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका वेबसाइटसह मोबाइल क्रमांक व बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नऊ ते १७ नोव्हेंबरच्या कालावधीत ऑनलाइन घडली.

ऑनलाइन सर्व काही उपलब्ध होत असल्याने अनेकजण अशा वाईट गोष्टींसाठी स्वत:ची फसवणूक करून घेतात. अशा अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. यातील प्रमुख गोष्ट म्हणजे फसवणूक झाल्यावर प्रतिष्ठेपाई पोलिसांकडे जात नाहीत. अशी अनेक प्रकरणे आहेत. यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेकजणांना असा आर्थिक भूर्दंड बसल्यावर ते नुकसान सहन करतात आणि कोणाला काही बोलत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध रहा. पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!