Payment Apps : ‘त्या’ लोकांचे google pay, paytm, phone pe होणार बंद, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण…


Payment Apps  : Google Pay, Phonepe आणि Paytm च्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वापरकर्त्यांना त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे UPI आयडी न वापरल्याने युजरच्या समस्या वाढल्या आहेत.

आता NPCI ने Google Pay, Paytm आणि Phonepe संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून यात NPCI कडून Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या तृतीय पक्ष अॅप्सना UPI प्रदान करण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच UPI आयडी ३१ डिसेंबर २०२३ पासून बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, ज्या एका वर्षापासून कार्यरत नाहीत. जर तुम्ही देखील तुमचे UPI खाते वर्षभर वापरले नसेल तर ते ३१ डिसेंबर २०२३ नंतर बंद होईल. तुमच्या UPI आयडीवरून मागील एका वर्षात जर कोणतेही पैसे क्रेडिट झाले नसतील तर ही खाती बंद करण्यात येणार आहेत. Payment Apps

दरम्यान, UPI आयडी बंद करण्याचे कारण म्हणजे वापरकर्त्याची सुरक्षा. बऱ्याच वेळा वापरकर्ते त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करत असतात, असे झाले तर वापरकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक होते.

फसवणुक होऊन नये म्हणून ३१ डिसेंबरपासून Google Pay, Phonepe आणि Paytm च्या वापरकर्त्यांना त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्यात आला आहे. यामुळे त्याचे समस्या वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!