Parth Pawar : अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला, पुण्यात गँगवॉर सुरू असताना चर्चेला उधाण…


Parth Pawar : पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेल्या व्यक्तींचा प्रभाव अनेकदा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने असतात, यानुसार अनेकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलत असतात.

या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गजा मारणे याने गुरुवारी सकाळी सपत्नीक पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत.

पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात मारणे, मोहोळ या टोळ्यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळ याची कोथरुडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने या हत्येचे राजकीय पडसादही उमटले होते. Parth Pawar

त्यानंतर गजा मारणे यांनी पार्थ पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. गजा मारणे याच्यावर खंडणी, मोक्कासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पार्थ पवार आणि गजा मारणे यांची भेट वादाचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट);शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते. गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणेची पत्नी जयश्री मारणे या माजी नगरसेविका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मारणे दाम्पत्याने पार्थ पवारांची भेट घेतल्याने या भेटीची चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!