Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट, पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्देशून सोशल माध्यमावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.
वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘एकच पर्व ओबीसी सर्व’, ‘जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार’ अशी रील पोस्ट केली होती.
संबंदित इन्स्टाग्राम रीलवर देवडी येथील धनंजय झाटे या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुत्व, दुर्भावना वाढवून एकोपा टिकू नये, या उद्देशाने पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली. Pankaja Munde
दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील तरुणाने सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
या पोस्टनंतर जिंतूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर जिंतूर शहरातील बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन तरुणावर गु्न्हा दाखल केला होता. .