Pankaja Munde : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे मोठं वक्तव्य, म्हणाल्या….

Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अशातच आज पंकजा मुंडे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. Pankaja Munde
हा संघटनेचा दौरा आहे. १०० ते १५० पदाधिकारी बैठकीला असतील आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. विधानसभेची ही पूर्व तयारी आहे. तर आता एका मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक असतात त्यातून कसा मार्ग काढणार या प्रश्नावरतीही त्यांनी उत्तर दिले आहे.
चिंचवड विधानसभेत इच्छुकांची गर्दी मोठी आहे त्यातून कसा मार्ग काढणार? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रत्येकवेळी भाजप मार्ग काढतोच, आम्हाला इच्छुकांची यादीतून एकाचं नाव द्यावं लागतं. याची प्रॅक्टिस कोअर कमिटीला आहे, ते यातून तोडगा काढतील, असे त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या तुम्ही माझ्याकडून बातमी काढू नका, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे.