परीक्षा एकाची बसवलं दुसऱ्यालाच!! इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थ्याचा कारणामा आला समोर, गुन्हा दाखल…

मुंबई : सध्या राज्यात 12 वी ची परीक्षा सुरू आहे. बारावीची परीक्षा कालपासून सुरु झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. यामध्ये एकाच्या परीक्षेला दुसराच परीक्षार्थी येऊन बसल्याचं उघड झालं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत तोतया विद्यार्थ्याने पेपर लिहिला मात्र सही करताना घोळ झाल्याने प्रकार उघडकीस आला. तोतया परीक्षार्थींने पेपर ही लिहिला मात्र उत्तर पत्रिकेवर दोन वेगवेगळ्या सह्या दिसल्याने तो अडकला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला त्याने पेपरही दिला.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यामुळे मोठी खळबळ उडाली. नंतर ससाणे यांनी केंद्र प्रमुख यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
केंद्र प्रमुख अंकुश भोसले यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वैभव केशवराव कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात मोठा गाजावजा करत कॉपी मुक्त अभियान राबवणाऱ्या प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी कॉपी करण्यात आली. विविध ठिकाणी जणांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा. परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.