कोरेगावमूळला गळफास घेऊन एकाची आत्महत्या…

उरुळी कांचन : कोरेगावमूळ येथील एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बोधेकाकडे वस्ती कोरेगावमूळ (ता. हवेली जि. पुणे) मंगळवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
प्रमोद बळीराम राठोड (वय. ४२ वर्षे रा.बोधेकाकडे वस्ती कोरेगावमूळ ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रंजना प्रमोद राठोड (वय. ३३ वर्षे सध्या रा. बोधेकाकडे वस्ती कोरेगावमूळ ता. हवेली जि. पुणे मुळ रा. मुंगशी ता. पुसद जि. यवतमाळ) यांनी याप्रकणाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सारांश व रंजना प्रमोद राठोड आपल्या पाच मुलांसोबत कोरेगावमूळ येथे राहतात. तसेच रंजना प्रमोद राठोड शेत मजुरी करून त्याचे कुटुंबाची उपजीवीका करतात. तसेच मंगळवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरातील स्वयंपाकाचा गॅसची शेगडी खराब झाल्याने रंजना प्रमोद राठोड भाउ नेमचंद येदुसिंग जाधव याला घेवून त्यांच्या टुव्हीलर गाडीवर उरुळीकांचन येथे गेले होते.
दरम्यान, गॅसची शेगडी दुरूस्त करून माझे भावाने मला घरी सोडले त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्याचे पती नामे प्रमोद बळीराम राठोड घरातील अगलला नायलानच्या रस्सीने गळ फास घेवून लटकलेले दिसले.
त्याच्या पत्नी यांनी तत्काळ त्यांच्या भावाला बोलावून सदर घटनेची माहीती दिली. त्यांच्या भावाने सदर घटनेची माहीती गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दिली आहे. तसेच प्रमोद बळीराम राठोड यांनी आत्महत्या का? केली याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहे.