Accident : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एसयुव्ही कारचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू

रामबन : जम्मू-श्रीनगर येथील रामबन जिल्ह्यामध्ये शुक्रवारी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून एक एसयूव्ही गाडी घसरून दरीत पडल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक एसयूव्ही गाडी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून घसरून दरीत पडली. या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी श्रीनगर येथून जम्मूला जात होती.
मध्यरात्री एकच्या सुमारास रामबन जिल्ह्याच्या बॅटरी चष्मा परिसरात एक एसयूव्ही गाडी ३०० फूट खोल दरीत पडली. यात १० जणांचा मृत्यू झाला असून सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण जात होते. मृतांमध्ये कार चालक जम्मूचे अंब घ्रोथाच्या बलवान सिंह (४७) आणि बिहारचे पश्चिमी चंपारणचे विपीन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे.
